मोठी कारवाई: कोल्हापूरातील आयआरबी कार्यालयातील पोलिस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

33

कोल्हापूर, दि. १७ (पीसीबी) – लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर शहरातील पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळील भारत राखीव बटालियनच्या (आयआरबी) कार्यालयात छापा टाकून ४० हजारांची लाच स्वीकारताना सहा जणांना रंगेहात पकडले आहे. यामध्ये एका पोलीस निरीक्षकासह दोन सहाय्यक फौजदार, एक कॉन्स्टेबल आणि क्लार्कचा समावेश आहे.

या कारवाईबाबत आज मंगळवार सायंकाळी पाच वाजता सविस्तर माहिती दिली जाणार असल्याची माहिती एसीबी कोल्हापूर कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. लाचलुचपत विभागाने केलेली ही कारवाई आजपर्यंतची सर्वात मोठी आहे असेही सांगण्यात येत आहे.या कारवाईमुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे.