मोटरमेनचा संप अखेर मागे; रेल्वे प्रवाशांना दिलासा

76

मुंबई, दि. १० (पीसीबी) – मोटरमेनचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे घरी जाणाऱ्या मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. म.रे. हे बिरूद मिरवणारी मध्य रेल्वे रोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडतेच आहे. अशात आज (शुक्रवारी) ती रखडली मोटरमेननी ओव्हरटाइम न करण्याचा निर्णय घेतल्याने. मात्र मोटरमेन आणि रेल्वे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे. त्यामुळे संप मागे घेण्यात आला आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.