मैत्रीच्या नात्याला विरोध केल्यामुळे अल्पवयीन भाच्याने केली मामीची हत्या

661

चेन्नई, दि. ६ (पीसीबी) – मुलीसोबत असलेल्या मैत्रीच्या नात्याला विरोध केला म्हणून १५ वर्षीय भाच्याने मामीची टेडी बियरने तोंड दाबून हत्या केली. आरोपी एवढयावरच थांबला नाही तर त्याने आत्महत्या भासवण्यासाठी तिचे मनगटही चिरले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.३) चेन्नईच्या अमिनजीकाराय भागात घडली.

तामिलसेल्वी (वय ३५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय अल्पवयीन आरोपी हा मयत तामिलसेल्वीचा भाचा आहे. त्याचे तामिलसेल्वीच्या मुलीबरोबर मैत्रीसंबंध होते. तामिलसेल्वीला हे अजिबात मान्य नव्हते. मागच्या आठवडयात तिने यावरुन आरोपीला सुनावले होते. त्याच रागातून आरोपीने तिची टेडी बियरने तोंड दाबून हत्या केली. तसेच ती आत्महत्या भासवण्यासाठी तिचे मनगटही चिरले. पोलिसांनी तामिलसेल्वीच्या घराजवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीला अटक केली.  त्याची चौकशी केली असता आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.