मैत्रिणीसोबत रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

18

सांगवी, दि. २२ (पीसीबी) – मैत्रिणीसोबत रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका महिलेचे 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 21) रात्री साडेसात वाजता फेमस चौक, नवी सांगवी येथे घडली.

अमृता योगेश पाटील (वय 26, रा. केशवनगर, मांजरी) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमृता आणि त्यांची मैत्रीण रेणुका वासगे या दोघी सोमवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास फेमस चौक, नवी सांगवी येथील वंदन स्वीटच्या समोरून पायी चालत जात होत्या. त्यावेळेची दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी अमृता यांच्या गळ्यातील 16 ग्रॅम वजनाचे 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare