मेस्मा कायदा लागू केलेले ससून रुग्णालय हे राज्यीतल पहिले रुग्णालय

80

पुणे, दि. १० (पीसीबी) – पुण्यातील ससून रूग्णालयावर मेस्मा कायदा लागू केल्याने ससून रुग्णालय हे राज्यातील पहिले रुग्णालय ठरले आहे. हा कायदा लागू झाल्यामुळे आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिने अत्यावश्यक सेवा बंद ठेवता येणार नाही. तसेच हा कायदा लागू केल्यामुळे यापुढील काळात रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना कुठल्याच प्रकारचा संप पुकारता येणार नाही.

काही दिवसांपूर्वी इथल्या परिचारिकांनी बदलीच्या विरोधात संप पुकारला होता. त्यानंतर झालेल्या वाटाघाटीनंतर हा संप मागे घेण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर सरकारने हा कायदा लागू केला असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, शासनाचा हा निर्णय म्हणजे कर्मचारी संघटनांच्या अधिकारांची मुस्कटदाबी असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.