मेफेड्रोन विक्रीसाठी मुंबईतून आलेला शम्स झवेरी पोलिसांच्या जाळ्यात

50

पिंपरी, दि.१४ (पीसीबी) : सिंहगड रस्ता पोलिसांनी अमली पदार्थ विक्रीसाठी मुंबईतून आलेल्या शम्स महमद अली जवेरी (वय 60) याला अटक केली आहे. नवले ब्रिज कडे जाणाऱ्या सर्विस रस्त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 20 ग्रॅम 460 मिलीग्रॅम मेफेड्रोन हे अमली पदार्थ सापडले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी त्यांना नवले ब्रिजकडे जाणाऱ्या सर्विस रस्त्यावर असलेल्या चैतन्य बियर शॉपी समोर 60 वर्षीय व्यक्ती संशयास्पदरित्या हालचाल करताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडून अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ हे अमली पदार्थ सापडले.

त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत आरोपी मीरा रोड, ईस्ट मुंबई येथून पुण्यामध्ये अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आला होता. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. 15 सप्टेंबर पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

WhatsAppShare