मेडिकल व्यवसायात भागीदारी देण्याच्या बहाण्याने 15 लाखांची फसवणूक

70

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – तळवडे येथे नव्याने सुरु होत असलेल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल व्यवसाय सुरु करण्यासाठी भागीदारी म्हणून 15 लाख रुपये घेत फसवणूक केली. ही घटना 29 डिसेंबर 2022 ते 3 एप्रिल 2023 या कालावधीत इंद्रायणीनगर भोसरी येथे घडली.

स्वप्नील पोपट भालेराव (वय 32, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. महेश काकडे (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना तळवडे येथे नव्याने एक हॉस्पिटल सुरु होत असून त्यामध्ये मेडिकल व्यवसाय सुरु करण्यासाठी भागीदारी देतो असे म्हणून फिर्यादी आणि इतर दोन तीन व्यक्तींकडून भागीदारीच्या नावाखाली पैसे घेतले.फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीकडून 15 लाख रुपये घेतले. ते पैसे आरोपीने स्वताच्या फायद्यासाठी वापरून त्यांची आर्थिक फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.