मेट्रोमोनीयल साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने केली महिलेची 62 लाखांची फसवणू

144

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – भारत मेट्रोमोनीयल अॅपवरून ओळख झालेल्या एका व्यक्तीच्या त्याच्या साथीदारांसोबत मिळून एका महिलेची तब्बल 62 लाख रुयांची फसवणूक केली. आरोपी व्यक्तीने तो यु के येथे सिव्हिल इंजिनिअर असून महिलेसोबत लग्न करण्यासाठी तो तयार आहे. तसेच भारत येऊन जाण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला 62 लाखांचा गंडा घातला. हा प्रकार 9 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला आहे.

नेहा सतप्रकाश पवार (वय 37, रा. वाकड. मूळ रा. करनाल, हरियाणा) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोबाईल क्रमांक +447537106849, +447513331647, 9870419133 धारक नतिश राजेश के, मोबाईल क्रमांक 918608497814 वर बोलणारी महिला, मोबाईल क्रमांक 8798046657, 6387960217 वर बालणारी व्यक्ती आणि मेल आयडी customerservic[email protected] धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची भारत मेट्रोमोनीयल अॅपवरून एकमेकांशी ओळख झाली. त्यांनतर दोघांमध्ये व्हाट्सअप कॉल, व्हिडीओ कॉल आणि कॉलद्वारे संपर्क झाला. आरोपी हा युके मध्ये सिव्हिल इंजिनिअर आहे असे त्याने भासवले. त्यातून फिर्यादीसोबत ओळख वाढवली. फिर्यादी सोबत लग्न करण्याचे व भारतात येऊन स्थायिक होण्याचे त्याने आमिष दाखवले. त्याने फिर्यादीच्या नावावर व पत्त्यावर भारतात लगेज पाठवले असल्याचे सांगितले.

दरम्यान एक महिला कस्टम अधिकारी व आरबीआय कर्मचारी म्हणून बोलणा-या व्यक्तींच्या माध्यमातून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्याने पाठवलेले सामान विमानतळावर आले असून ते सोडविण्यासाठी विविध प्रकारचे टॅक्स, फाईन व प्रोसेस फीच्या नावाखाली विविध बँक खात्यावर तब्बल 61 लाख 99 हजार 768 रुपये फिर्यादी महिलेला भरण्यास भाग पाडले. फिर्यादीला आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात गुन्हा नोंदवला. पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल तपास करीत आहेत.