मेघा साळुंके ठरली महाराष्ट्राची सर्वांगसुंदरी २०२१

176

– पुणे येथे लॉलीपॉप इंटरटेनमेंट प्रस्तुत महाराष्ट्राची सर्वांगसुंदरी स्पर्धा संपन्न

पुणे, दि.१७ (पीसीबी) : महिला ह्या समाजाचा कणा आहेत. महिलांनाही स्वतंत्रपणे जगता आल पाहिजे.लॉलीपॉप इंटरटेनमेंट च्या माध्यमातून येणाऱ्या काळात नवनवीन अभिनेत्र्या घडणार आहेत असे प्रतिपादन देव माणूस मधील फेमस अभिनेत्री अस्मिता देशमुख यांनी केले. पिंपरी-चिंचवड येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे (दि.१४) महाराष्ट्राची सर्वांगसुंदरी स्पर्धा पार पडली यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी अस्मिता देशमुख म्हणाल्या, आपल्या समाजामध्ये पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे महिलांना नेहमीच दुय्यम वागणूक दिली जाते. महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. चित्रपट क्षेत्रातही महिला अग्रेसर आहेत. लॉलीपॉप इंटरटेनमेंट महिलांसाठी उपलब्ध केलेल्या महाराष्ट्राचा सर्वांगसुंदरी या स्पर्धेमुळे महिलांच्या व छोट्या मोठ्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे.
महिला आणि मुलींच्या गटात महाराष्ट्राची सर्वांगसुंदरी ठरल्या त्या सौ मेघा साळुंखे त्यांना प्रथम पारितोषिक भेटले. दुसरा क्रमांक सिद्धी पंडित तर तृतीय क्रमांक प्रियंका बोरसे आणि रितिका पालमदूरकर यांना विभागून देण्यात आला.त्यांना बक्षिसाची रक्कम अनुक्रमे 25000,21000,15000 आणि क्राउन देण्यात आला. तसेच लहान गटात प्रथम विजेती लास्या शेट्टी, दुतिय  स्पंदन आढळराव आणि तृतीय आस्था बागरीच्या ठरली.त्यांना बक्षिसाची रक्कम अनुक्रमे 10000 ,7000,5000 आणि क्राउन देण्यात आला. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. 
या कार्यक्रमाचे ग्रुपिंग अभिनेत्री मॉडेल पूजा रेड्डी आणि आकाश पणदे यांनी केली. कार्यक्रमाचे पंच म्हणून दिपाली गोसावी आणि अभिनेते मॉडेल साई प्रसाद यांनी कामकाज पाहिले. समारोप लॉलीपॉप इंटरटेनमेंट चे संजय जोगदंड यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे बंड्या तर प्रस्तावना लोक न्याय न्यूजचे संपादक सुरज साळवे यांनी केली.