मेक्सिकोतील प्लाया नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात १५ जणांचा मृत्यू

162

गुआनाजुआटो, दि. १० (पीसीबी) – मेक्सिकोतील गुआनाजुआटो राज्यातील प्लाया नाईट क्लबमध्ये एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १५ जणांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोतील गुआनाजुआटो राज्यातील येथील पेट्रोले मॅक्सोसोस (PEMEX) या इंधन कंपनीमध्ये गेल्या वर्षभरात ३ बिलियन अमेरिकन डॉलरच्या इंधनाची चोरी झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी इंधन चोरी करणाऱ्या आरोपींविरोधात एक मोहित उघडली असून घरपकड सुरू आहे. यामधील आरोपीनेच शनिवारी रात्री नाईटक्लबमध्ये अंधाधुंद गोळीबार केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.