‘मृत्यू प्रमाणपत्र आताच काढून पाठवा नाही तर संध्याकाळपर्यंत सस्पेंडची ऑर्डर देईन’: कामचुकार ग्रामसेवकाला अब्दुल सत्तारांनी झापलं

125

औरंगाबाद, दि.१४ (पीसीबी) : जनतेच्या कामासाठी सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना भिडणाऱ्या नेत्यांमध्ये काही नावं अग्रेसर आहेत. त्यातील एक नाव म्हणजे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार औरंगाबादमध्ये मृत्यू प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवाकला अब्दुल सत्तार यांनी फोनवरच झापले. मृत्यू प्रमाणपत्राची कॉपी लगेच पाठवा, नाहीतर संध्याकाळ पर्यंत निलंबित करेन, असा दम अब्दुल सत्तार यांनी ग्रामसेवकाला भरला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी डोणगावकर यांचं निधन झालं. मात्र त्यांचं मृत्यूपत्र देण्यासाठी ग्रामसेवक टाळाटाळ करत होता. हा प्रकार समजल्यानंतर ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच भडकले. त्यांनी थेट ग्रामसेवकाला फोन लावला. त्यानंतर त्यांनी मृत्यू प्रमाणपत्राची कॉपी लगेच पाठवा, नाहीतर संध्याकाळ पर्यंत निलंबित करेन, असा दम भरला. अब्दुल सत्तार यांनी ग्रामसेवकाला दम भरल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले कि, मृत्यू प्रमाणपत्र का दिले नाही? ते आताच काढून पाठवा पहिले तात्काळ. नाही तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत सस्पेंडची ऑर्डर दिली तर चालेल का काहीतरी? तुम्ही लोकांच्या सेवेसाठी आहे. मृत्यू-जन्म सर्टिफिकेट देणं हे आपलं कर्तव्य आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडत नसाल तर तुम्ही अकार्यक्षम आहे, असं नाही चालणार. मला कॉपी पाठवा बस्स, मला बाकी काही सांगू नका.

तात्काळ कॉपी पाठवा. काय काम करतात हे, मृत्यू प्रमाणपत्र देत नाही म्हणजे किती बोगस लोक आहेत, राजकारण कुठे करावं याची पण एक सीमा असते.’

 

WhatsAppShare