मृत्यूची बातमी आफवाच , मुमताजनेच केला खुलासा

79

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : बॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री मुमताजच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर २ – ३ दिवसांपासून व्हायरल झाली आहे. परंतु मुमताजने स्वत:च व्हीडीओ द्वारे याचा खुलासा केला. माझ्या मृत्यूच्या बातम्या आफवा आहेत व मला काहीही झाले नसून मी ठणठणीत आहे असे मुमताजने व्हीडीओमध्ये म्हंटलं आहे.

सोशल मीडियावर मुमताज यांच्या मृत्यूची अफवा जोरात आहे. त्यामुळे खुद्द मुमताज यांनी या अफवांना पूर्णविराम दिलं आहे. माझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा ते गुपित नसेल,असं त्या म्हणाल्या. मुमताज यांची मुलगी तान्या माधवनीने आपल्या आईची खुशाली सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना कळवली आहे.
तान्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मुमताज यांचे आरोग्य स्थिर असल्याचे दिसून येते. ‘मी माझ्या सर्व चाहत्यांवर खूप प्रेम करते. माझा मृत्यू झालेला नाही. मी जिवंत आहे. लोक बोलत आहेत तेवढी वृद्ध मी अद्याप झालेली नाही. तुमच्या प्रार्थनांमुळे मी अजूनही छान दिसत आहे.’ असं मुमताज या व्हिडिओमध्ये बोलत आहेत.

सांगायचं झाल तर, मुमताज ७३ वर्षांच्या आहेत. सध्या त्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. मुमताज यांचा जो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो फार वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हा त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. आता त्या उत्तम आयुष्य जगत आहेत असं त्यांच्या मुलीने व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

१९७०च्या प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांनी मेला, अपराध, नागिन, ब्रम्हचारी, राम और श्याम, दो रास्ते, फौलाद, वीर भीमसेन. सिकंदर-ए-आजम, खिलौना यांसारख्या चित्रपटातून आपल्या अदाकारीने चित्रपटसृष्टीत दमदार कामगिरी केली आहे.

WhatsAppShare