मूळ ओबीसी नगरसेवकालाच महापौर करा; भाजप नगरसेवक संदिप कस्पटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

86

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी मूळ ओबीसी नगरसेवकाचीच निवड करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक संदिप कस्पटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात नगरसेवक कस्पटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महापालिकेचे महापौरपद हे अडीच वर्षांसाठी इतर मागासवर्गासाठी राखीव आहे. महापौरपदी संधी मिळवण्यासाठी मूळ ओबीसी समाज सरसावला आहे.