मूर्तिजापूरमध्ये भारिप बहुजन महासंघाच्या नेत्याची हत्या; आरोपी अटकेत

485

अकोला, दि. २० (पीसीबी) – वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर येथे हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलावर आणून पूरामध्ये फेकून देण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले असून, रात्री उशिरा वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान सदस्य ज्योती गणेशपुरे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच ज्योतीच्या बहिणीची मुले आणि तिच्या मुलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मारेकऱ्यांनी आसिफ खान यांच्या हत्येची कबुली दिली असून, त्यांचा मृतदेह पूर्णा नदीच्या पुरात फेकून दिल्याचेही त्यांनी कबूल केले आहे; मात्र आसिफ खान यांचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत सापडला नाही.