मुस्लिम तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याने दलित तरुणाची हत्या

155

बारमेर, दि. २५ (पीसीबी) – राजस्थानमधील बारमेर येथे मुस्लिम तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याने एका दलित तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

खेतराम भीम (वय २२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेतराम हा मेहबूब खान यांच्या घरी काम करायचा. त्यांच्या घरातील तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी त्याला चेतावणी दिली होती. शुक्रवारी सदाम खान आणि हरियत खान यांनी खेतरामला शेतात बोलावले. तिथे आधीच काहीजण त्याची वाट पाहत थांबले होते. खेतराम पोहोचल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. हात बांधून जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही तोपर्यंत मारहाण करण्यात आली. मृत्यू झाल्यानंतर मृतदेह काही अंतरावर फेकून देण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.