मुस्लिम तरुणाला मारहाण करुन काढायला लावली दाढी

383

गुरगाव, दि. २ (पीसीबी) – दाढी वाढवल्याच्या कारणाने एका मुस्लिम तरुणाला जमावाने मारहाण करुन जबरदस्तीने दाढी कापण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना हरियाणातील गुरुग्राम येथे घडली.

जफरुद्दीन हमीद (वय ३९, रा. मेवत, गुरगाव, सेक्टर २९)  असे मारहाण करुन दाढी काढायला लावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने गुरगाव येथे अज्ञात हल्लेखोरांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हरयाणातील गुरगावचा रहिवासी असलेल्या जफरुद्दीन हमीद या तरुणाला काही लोकांनी मारहाण केली. तसेच त्याच्या धर्मावरुन शेरेबाजी करीत जबरदस्तीने दाढी काढायला भाग पाडले. या टोळक्याने जफरुद्दीनला जबरस्तीने सलूनमध्ये नेऊन तेथील कर्मचाऱ्याला त्याची दाढी काढायला सांगितली. मात्र, कर्मचाऱ्याने असे करायला नकार दिल्याने या टोळक्याने दोघांनाही मारहाण केली. ‘तू पाकिस्तानी असल्याने दाढी करायला नकार देत आहेस’, असे म्हणत टोळक्याने जबरदस्तीने सलूनमध्ये नेऊन खुर्चीला बांधून दाढी करायला भाग पाडले, असे जफरुद्दीनने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. गुरगाव पोलीस  तपास करत आहेत.