मुशर्रफच्या नातेवाईकाच्या कार्यक्रमात मिका सिंगचा परफॉर्मन्स; चोहीकडून टिकेची झोड

162

कराची, दि. १२ (पीसीबी) – पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशातील संबंध ताणावले असताना बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगने कराची येथे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्या एका नातेवाईकाच्या मेहंदीच्या कार्यक्रमात सिंगिंग परफॉर्मन्स दिल्याने चोहीकडून टिकेची झोड उठली आहे.

ट्विटरवर मिकाच्या पाकिस्तानमधील कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायल झाला आहे. हा व्हिडिओ मुशर्रफ यांच्या एका नातेवाईकाच्या मेहंदीचा कार्यक्रमाचा असल्याचे पाकिस्तानातील पत्रकार नायला इनायतने म्हटले आहे. यामुळे मिका सिंग चांगलाच ट्रोल झाला आहे.