मुळशी तालुक्यातील सुभद्रा लॉन मंगल कार्यालयासमोर आगीत गाड्या जळून खाक

256
पौड, दि.८ (पीसीबी) – मुळशी तालुक्यात चाले गावा जवळ असणारे सुभद्रा लॉन मंगल कार्यालयासमोर भीषण आगीत दोन चारचाकी आणि दोन दुचाकी गाड्या जळून खाक झाले आहेत. आगीेचे कारण अस्पष्ट
प्राथमिक माहितीनुसार, मुळशी तालुक्यात चाले गावा जवळ असणारे सुभद्रा लॉन मंगल कार्यालयासमोर आगीत दोन चारचाकी आणि दोन दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. पौड पोलिसांना या घटनेची माहिती आज दि.८ रविवार रोजी  दुपारी २ वाजता मिळाली या घटनेची माहिती मिळताच पौड पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी शिंदे, पोलिस हेडकोन्टेबल मंगेश लांडगे यांच्या सहकार्यांसह घटनेस्थळी दाखल होऊन तिथल्या नागरीकांच्या मदतीने आगीला नियंत्रणीत आणण्यात यश मिळाले. या आगीत कोणतेही जीवितहानी झालेली नाही.  या आगीत गाड्यांचे भरपूर नुकसान झाले आहे. गाड्यांना आग कशामुळे लागली अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा पुढील तपास पौड पोलीस करीत आहे.