मुळशीत महिलेची जागा बळकवण्याचा प्रयत्न; तिघांविरोधात गुन्हा

2843

हिंजवडी, दि. २४ (पीसीबी) – एका महिलेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन तिघा आरोपींनी महिलेच्या नावावरील तीन गुंठे जागेवर जबरदस्ती ताबा टाकून तारेचे कंपाउंड केले. ही घटना हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील पुनावळे माळवाडी येथे घडली.

याप्रकरणी ४६ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शंकर बाबुराव दर्शिले, प्रभाकर शंकर दर्शिले आणि विक्रम शंकर दर्शिले (सर्व रा. माळवाडी पुनावळे ता मुळशी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ४६ वर्षीय महिलेची पुनावळे माळवाडी येथे सर्वे नं. ४१/२७ या ठिकाणी ३ गंठे जागा आहे. त्यांच्या नावावर जागेचे खरेदीखत आणि ७/१२ देखील आहे. मात्र आरोपी शंकर दर्शिले आणि त्यांची दोन मुले प्रभाकर दर्शिले आणि विक्रम दर्शिले यांनी या जागेवर जबरदस्तीने ताबा टाकला आणि तारेचे कंपाऊड देखील बांधले. हे समजताच महिलेने आरोपींना याचा जाब विचारला मात्र आरोपींनी महिलेला शिवीगाळ करत जीवेमारण्याची धमकी देऊन पसार झाले. याप्रकरणी तिघा आरोपींविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक एन.टी.गभाले तपास करत आहेत.