मुळशीत फायटर कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणारे १६ जण गजाआड

361

पुणे, दि. १७ (पीसीबी) – कोंबड्यांना निदर्यपने वागवत त्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणाऱ्या १६ जणांना पौड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.१६) पहाटे दोनच्या सुमारास मुळशी येथील भुगावातील मुकाईवाडीत असलेल्या निर्सग लॉज येथे करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम १ लाख ५ हजार, जुगाराचे साहित्य, विदेशी मद्य आणि ८ ते १० फायटर कोंबडे जप्त केले आहेत.

विश्वनाथ शेट्टी, राजेश रई, अरुण सरोदे, प्रकाश पुजारी, हरीश पुजारी, नारायण पवार, सुरंदर हेगडे, संदीप शेट्टी, वासू खरकेरा, रविंदर सिंग, मकरंद घाडगे, सायन छत्री, कुबेर अधिकारी, बाळकृष्ण इलतवारी,  प्रसन्न शेट्टी आणि गंगाधर कोरायन असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खबऱ्याने पैड पोलिसांना मुळशी येथील भुगावातील मुकाईवाडीत असलेल्या निर्सग लॉजवर काही लोक रात्रीच्या वेळेस फायटर कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती दिली. यावर पौड पोलिस आणि पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हेशाखेने संयुक्तरित्या गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास निर्सग लॉजवर धाड टाकली. यावेळी पोलिसांना तेथे १६ जण कोंबड्यांना निदर्यपने वागवून त्यांच्या झुंजीवर पैसे लावत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे. तसेच लॉज मधून रोख रक्कम १ लाख ५ हजार, जुगाराचे साहित्य, विदेशी मद्य आणि ८ ते १० फायटर कोंबडे जप्त केले आहेत. पौड पोलिस अधिक तपास करत आहेत.