मुळशीत कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणारे १६ जण गजाआड

94

पुणे, दि. १७ (पीसीबी) – कोंबड्यांना निदर्यपने वागवत त्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणाऱ्या १६ जणांना पौड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.१६) पहाटे दोनच्या सुमारास मुळशी येथील भुगावातील मुकाईवाडीत असलेल्या निर्सग लॉज येथे करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम १ लाख ५ हजार, जुगाराचे साहित्य, विदेशी मद्य आणि ८ ते १० फायटर कोंबडे जप्त केले आहेत.