मुली झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

21

दिघी, दि. 25 (पीसीबी) : तीन मुली झाल्याच्या कारणावरून पती, दीर आणि एका महिलेने विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पीडित विवाहितेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पती दत्तात्रय मोतीराम इटकर (वय 39, रा. गणेशनगर, दिघी), दीर श्रावण मोतीराम इटकर (वय ४३, रा. चोराखळी, ता. कळंब) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2017 ते 23 ऑक्टोबर 2021 या कालावधीत चोराखळी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद, बेंगलोर, आसाम, भटिंडा, खडकी पुणे आणि गणेशनगर दिघी पुणे येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेला तीन मुली झाल्या. या कारणावरून तसेच घरातील किरकोळ कारणावरून आरोपींनी पीडित विवाहितेला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला. क्रूरपणाची वागणूक देऊन विवाहितेचा छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare