मुलीला शाळेत सोडायला गेलेल्या पित्याचा करंट लागून मृत्यू

449

दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – मुलीला शाळेत सोडायला गेलेल्या एका पित्याला रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारेचा करंट लागल्याने  मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास दिल्लीतील एनसीआरमधील इंदिरापुरम येथे घडली.

सरोज (वय ३४) असे  मृत्यू  झालेल्या पित्याचे नाव  आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास एनसीआरमधील इंदिरापुरम येथे जोरदार पाऊस सुरु असताना सरोज आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी चालले होते. यावेळी रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारेचा करंट लागून त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते तर कदाचित ही दुर्घटना झाली नसती. दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.