मुलानेच चोरले घरातील सव्वासहा लाखांचे दागिने; मुलासह पाच जणांना अटक

74

थेरगाव, दि. २७ (पीसीबी) – मुलानेच घरातून सहा लाख 30 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी मुलगा व त्याचे तीन साथीदार तसेच चोरीचे दागिने विकत घेणारा व्यावसायिक, अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 13 एप्रिल ते 24 सप्टेंबर 2021 या कालावधीत जय मल्हार नगर, थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी 46 वर्षीय महिलेने रविवारी (दि. 26) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचा मुलगा वैष्णव कालिदास शेळके (वय 23, रा. मल्हार नगर) याच्यासह त्याचे साथीदार हर्षद शांताप्रकाश शास्त्राना (वय 20, रा. थेरगाव), हर्षद सुरेंद्र कांबळे (वय 18, रा. थेरगाव), अनिकेत दीपक सुतार (रा. वाकड) तसेच चोरीचे दागिने खरेदी करणारा विजय रामचंद्र विस्पुते (विजय ज्वेलर्स, पिंपळे निलख, सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या घरातील पिवळ्या धातूचे दागिने फिर्यादीचा मुलगा वैष्णव शेळके व त्याच्या तीन साथीदारांनी चोरी केले. फिर्यादीचे सहा लाख 30 हजार रुपये किमतीचे दागिने आरोपींनी चोरून नेले. ते सोन्याचे दागिने चोरीचे आहेत असे माहीत असतानाही आरोपी विजय विस्पुते याने दागिने खरेदी केले.

दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare