मुठा नदी पात्रात मगर आढळल्याने खळबळ; नागरिकांना सावधतेचा इशारा

120

पुणे, दि. १० (पीसीबी) – नांदेड, शिवणे ग्रामपंचायत परिसरातील मुठा नदी पात्रात मगर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये, असे आवाहन नांदेड, शिवणे ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.

यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी देखील धरण क्षेत्रात मगर आढळल्याची बाब समोर आली होती. आता यावर प्रशासन काय उपाययोजना करणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.