‘मुघलांनीच भारताला श्रीमंत केले’; वादग्रस्त ट्विटनंतर स्वरा भास्कर ट्रोल

119

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – नेहमीच वादगस्त ट्विट करत चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आणखी वाद ओढवून घेतला आहे. ‘मुघलांनीच भारताला श्रीमंत केले,’ असं तिने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटसोबत तिने ‘फॅक्ट’ आणि ‘हिस्ट्री’ या हॅशटॅगचा वापर केला आहे. स्वराच्या या ट्विटवर नेटकरी संतापले असून तिच्यावर जोरदार टीका केली आहे.

स्वराने तिच्या ट्विटमध्ये एक लेख शेअर केला आहे. या लेखात लेखकाने म्हटलं आहे की, ‘मुघल भारतात राज्य करण्याच्या हेतूने आले खरे पण त्यांच्यामुळे भारतातील जीवनमान बदलण्यास सुरुवात झाली. मुघलांनी भारतातील व्यापाराला चालना दिली. रस्त्यांची कामे केली. समुद्री मार्ग, बंदरे स्थापन करण्यास प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली.’ हा लेख शेअर करत स्वरा भास्करने मुघलांनीच भारताला श्रीमंत केले असे म्हटले आहे. तिच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

स्वराच्या या ट्विटनंतर, मुघलांनी कशाप्रकारे भारताला लुटले याचे उदाहरण देत अनेकांनी तिला समजावण्यासाठी ट्विट केले आहे. इतकेच नव्हे तर ट्विटरवर ‘#Mughals’ हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला आहे.