मुख्य रस्त्याचे काम रखडल्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने “रास्ता रोको आंदोलन”

172

पुणे, दि.२५ (पीसीबी) – पिसोळी उंड्री  मुख्य रस्त्याचे काम रखडल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने धर्मावत पेट्रोल पंपासमोर “रास्ता रोको आंदोलनकरण्यात आले.

यावेळी जिल्याचे नेते/मा. जि.प.अध्यक्ष श्री.जालिंदर भाऊ कामठेसरपंच मच्छिंद्र दगडे मा उपसरपंच गणपत दगडे ,उद्योजक राजेंद्रशेठ भिंताडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, वाहतूक विभागाचे निंबाळकर साहेब, मा सरपंच स्नेहल दगडे ,मा सरपंच सुभाष टकले , मा सरपंच किरण येप्रे ,सोमनाथ दगडे , मा उपसरपंच दिपक धावडे, देविदास मासाळ ,मोरेश्वर धावडे  युवा नेते आकाश टकले , लहू दगडेविनायक धावडे व या आंदोलनात सर्व ग्रामस्थ व परिसरातील नागरिक सहभागी होते.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पंधरा दिवसाच्या आतमध्ये काम चालू करण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शेख साहेब यांनी दिले

WhatsAppShare