मुख्याध्यापकासह १८ जणांचा विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार; बिहारमधील घटना

54

छपरा, दि. ७ (पीसीबी) – बिहारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत लज्जास्पद घटना घडली आहे. सारण येथील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापक, दोन शिक्षक आणि १५ विद्यार्थ्यांनी मिळून एका विद्यार्थीनीवर सात महिने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बिहार हादरून गेले आहे. सारण पोलिसांनी याप्रकरणी सहाजणांना अटक केली आहे. त्यात मुख्याध्यापक आणि एका शिक्षकासह दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

इयत्ता दहावीतील या विद्यार्थीनीवर गेल्या डिसेंबरपासून बलात्कार केला जात आहे. तिचे वडील एका गुन्ह्यात तुरुंगात होते. ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिने सर्व प्रकार वडिलांच्या कानावर टाकला. त्यानंतर सारण पोलीस ठाण्यात शुक्रवारी १८ जणांविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या टॉयलेटमध्ये सामूहिक बलात्कार करून त्याचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर हा व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत शाळेतच वारंवार बलात्कार केल्याचे पीडितीने तक्रारीत म्हटले आहे.

सदर विद्यार्थीनीने हा संपूर्ण प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितला होता. मात्र या मुख्याध्यापकाने या विद्यार्थ्यांवर कारवाई करायचे सोडून दोन शिक्षकांच्या मदतीने तिच्यावर बलात्कार केला. या बलात्कार प्रकरणात एकूण १५ विद्यार्थ्यांचा समावेश असून यातील १४ जण अद्यापही परार आहेत. पोलिस तपास करत आहेत.