मुख्यमंत्र्यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या विधानावर कसा विश्वास ठेवायचा ?- अशोक चव्हाण  

72

नांदेड, दि. ६ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या मराठा आरक्षणाबाबतच्या घोषणेवर   कसा विश्वास ठेवायचा, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी मेगाभरती स्थगित केल्याने अनेकांचे नुकसान होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.