मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच चिंचवड येथे मराठा क्रांची मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

356

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चिंचवड येथील दौऱ्यापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाच्या २० ते २५ कार्यकर्त्यांना  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज, सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय इमारत भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा आजचा चिंचवड येथील कार्यक्रम उधळून लावणार असे पत्रक काढले होते. यामुळे कार्यक्रमा दरम्यान काही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या २० ते २५ जणांना ताब्यात घेतले आहे.