मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काँग्रेसमध्ये स्वागतच केले जाईल – कमलनाथ

278

भोपाळ, दि. २ (पीसीबी) – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काँग्रेसमध्ये स्वागतच केले जाईल, असे विधान मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ  यांनी केले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर यांच्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना कमलनाथ यांनी हे विधान केले आहे.  

बाबूलाल गौर यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान छिंदवाडा येथील उत्तम विकासासाठी कमलनाथ यांच्या कामाचे कौतुक केले होते. त्यावरुन भोपाळ येथे पत्रकार परिषदेत कमलनाथ यांना प्रश्न केला होता. बाबूलाल गौर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे आमंत्रण देणार का? या प्रश्नावर कमलनाथ यांनी  केवळ बाबूलाल गौर यांनाच का मी तर शिवराजसिंह चौहान यांनाही निमंत्रण देतोय, असे विधान केले.

बाबूलाल गौर यांना सत्य माहित आहे.  यापूर्वी शहर विकास मंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. म्हणूनच त्यांनी मी केलेल्या विकासकामांचे कौतुक केले. गौर हे प्रामाणिक व्यक्ती असल्याने त्यांनी सत्य स्वीकारले आहे,  असे कमलनाथ म्हणाले.