मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधानांचे ऐकत नाहीत मग जनतेने का ऐकावे – अजयकुमार लल्लू

191

 

लखनऊ, दि.२५ (पीसीबी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचे घोषित केलं आहे. लोकांनी घराबाहेर पडू नका, ही कोरोनाविरुद्ध लढाई आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी साथ द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना केले. पण त्यांचं आवाहन त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून न पाळल्याने विरोधकांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

दरम्यान, यूपीच्या मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी टीका केली.

म्हणाले, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येला पोहचले. अयोध्येत प्रभू रामाची मूर्ती टेंटमधून हटवून तात्पुरत्या मंदिरात ठेवण्यात आली. राम मंदिराच्या निर्माणानंतर रामाची मूर्ती त्याठिकाणी स्थापित केली जाईल.नवरात्रीचा पहिला दिवस आहे. देवीच्या दर्शनाला जाण्याची माझीही इच्छा होती. पण पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे त्याचं पालन करायला हवे. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधानांचे ऐकत नाहीत मग जनतनं का ऐकावं, असा सवाल उत्तरप्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ३५ वर पोहचली आहे.

WhatsAppShare