मुख्यमंत्री मराठा आरक्षणावर जनतेशी आज संवाद साधणार

92

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (रविवार) जनतेशी संवाद साधणार आहेत. आज संध्याकाळी ७.३० वाजता आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री बोलणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आरक्षणावर काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभर वातावरण तापले आहे. गेली दोन वर्षे शांततेत मूक मोर्चे काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने आता ‘ठोक मोर्चे’ सुरु केले आहेत. मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे राजकीय आणि सरकारी पातळीवरील हालचालीना वेग आला आहे. त्यानंतर विरोधी पक्षांसह सरकारनेही बैठकांचा सपाटा सुरू केला आहे.

आरक्षणासाठी कटिबद्ध आहे, असे सरकारने सांगून मराठा समाजाला शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तरीही आंदोलन सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज नेमकी काय भूमिका मांडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.