मुख्यमंत्री ‘दूध का दूध’, ‘पाणी का पाणी’ होऊन जाऊ द्या – पृथ्वीराज चव्हाण

45

नागपूर, दि. ५ (पीसीबी) – सिडको भूखंड घोटाळ्याप्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी करून मुख्यमंत्री ‘दूध का दूध’, ‘पाणी का पाणी’ होऊन जाऊ द्या, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (गुरुवार) विधानसभेत म्हटले आहे.

सिडको भूखंड या घोटाळ्याचे सत्य समोर यावे, यासाठी घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी व्हावी. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोयना प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या  रायगड जिल्ह्यातील २४ एकर जमिनीमध्ये मोठा घोटाळा करण्यात आला आहे. अधिकारी व बिल्डरच्या संगनमताने हा घोटाळा करण्यात आला आहे. त्याला राजाश्रय मिळाला आहे.  त्यामुळे याची न्यायालयीन चौकशी करून प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनी प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी चव्हाण यांनी यावेळी केली.