मुख्यमंत्री तुम्ही चमच्याने दूध पित होता, तेव्हा शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती – तटकरे

73

भाजपच्या महामेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. मुख्यमंत्री महोदय, जर सूर्यावर थुंकाल तर तुमचीच जीभ जळेल. तुम्ही चमच्याने दूध पित होता, तेव्हा पवार साहेबांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला.  

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनानिमित्त मावळ येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत तटकरे बोलत होते.

यावेळी तटकरेंनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठविली. भाजपाने साडेतीन वर्षांत सरकार चालवले की मनोरंजन केले हेच समजत नाही. या सरकारने लोकांची फसवणूक केली असून खोटे बोलण्याचा सोयिस्कर कार्यक्रम या सरकारने सुरू केला आहे. या सरकारला आता खाली खेचण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.