मुख्यमंत्री ‘डेव्हलपमेंट फडणवीस’म्हणून ओळखले जातील – श्वेता शालिनी

114

पुणे, दि. १० (पीसीबी) –  महाराष्ट्राच्या इतिहासात संपूर्ण ५ वर्षांच्या कालावधीत मुख्यमंत्रीपदावर  राहून राज्यकारभार करणारे देवेंद्र फडणवीस दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळेच  महाराष्ट्राच्या इतिहासात  फडणवीस हे ‘डेव्हलपमेंट फडणवीस’ म्हणून ओळखले जातील,  असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार श्वेता शालिनी यांनी केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी व रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांच्या वतीने फर्गसन महाविद्यालयातील अम्फी थिएटर येथे आयोजित एका चर्चासत्रात  त्या बोलत होत्या.

‘गेन इनसाईट इनटू द लीडरशीप स्टाईल अँड डेव्हलपमेंट व्हिजन ऑफ महाराष्ट्राज् चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस’ अर्थात ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेतृत्वशैली व विकासदृष्टी’ हा या चर्चासत्राचा विषय होता.

श्वेता शालिनी म्हणाल्या की, राज्यातील अनेक अडचणी, ताणतणाव, आंदोलने, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक संकटांना तोंड देत फडणवीसांनी केलेला यशस्वी राज्यकारभार हा व्यवस्थापनशास्त्राचा विषय ठरला आहे. या विषयाचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसमोर देवेंद्र फडणवीस हे एक ‘केसस्टडी’ म्हणून समोर येत आहेत.  त्यांच्या याच पैलूंवर चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘देवेंद्र डेव्हलपमेंट डॉक्ट्रीन’ या पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.