मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा;दोन दिवसांत खातेवाटप करु

143

मुंबई,दि.२(पीसीबी) – बहुमत चाचणी, विधानसभाध्यक्ष निवडणूक, विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती यासह इतर कामासाठी बोलवण्यात आलेलं विधिमंडळाचं अधिवेशन काल संपलं आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत मंत्रिमंडळाचं खातेवाटप करु अशी घोषणा खुद्द नवनिर्वाचीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

नुकतचं पहिलं अधिवेशन पार पडलं आहे. मंत्रिंमंडळाने कामकाज करायला सुरुवात केलीय. एकूणचं राज्यातील परिस्थितीची महिती घ्यायला सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळाची प्राथमिक बैठक रविवारी झाली असून राज्याच्या परिस्थितीचं सगळ चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुढच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरु होईल.

सरकारचे जाहीर झालेले सात मंत्री एकत्रीतपणे काम करतो आहे. सगळी खाती आम्ही सात लोकं व्यवस्थितपणे हाताळत आहोत. त्यामुळे राज्याला जाण्यासाठी कुठेही अडथळा निर्माण होईल अस काही होतं नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

WhatsAppShare