मुंबई विद्यापिठाच्या स्वच्छतागृहात विद्यार्थीनीवर लैगिंक अत्याचार

396

मुंबई, दि. १० (पीसीबी) – मुंबई विद्यापिठाच्या कलिना कॅम्पसमधील स्वच्छतागृहात विद्यार्थीनीवर लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिडीत विद्यार्थीनीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

मुंबई विद्यापीठ रजिस्ट दिनेश कांबळे म्हणाले, ‘मुलीने त्या अज्ञात व्यक्तीला प्रतिकार करण्यापूर्वीच अज्ञात व्यक्तीने तेथून पळ काढला. आम्ही त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहोत. पण जिथे घटना घडली त्याच्या आजूबाजूला सीसीटिव्ही कॅमेरा नसल्यामुळे त्याला शोधण्यात अडचण होत आहे.’

दरम्यान विद्यापीठ प्रशासनाने सुरक्षेवर ७० लाख रूपये खर्च केला असून देखील अशा प्रकारच्या घटना घडतात आणि आरोपी फरार होतो. घडलेल्या घटना स्थळी सीसीटीव्ही नाही यामुळे विद्यार्थ्यी आणि पालकांनी संताप व्यक्त केला आहे.