मुंबई महापालिकेच्या कारभारात मुख्यमंत्र्यांची ढवळाढवळ – विश्वनाथ महाडेश्वर

72

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करत आहेत, असा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.पावसाळ्यात मुंबई तुंबली जाते. यावरून शिवसेना-भाजपमध्ये आरोपप्रत्यारोप होत असतात. यंदाही याच मुद्दयावरुन महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जुंपली आहे.

महापालिकेच्या प्रश्नांबाबतच्या मंत्रालयातील बैठकीला पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवले जाते. तसेच आपत्कालीन व्यवस्थापनाच्या बैठकीला मुंबईच्या महापौरांना निमंत्रित केले जाते. मात्र, मुख्यमंत्री महापालिकेच्या निर्णयात हस्तक्षेप करतात.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करु शकतात. मात्र, मुंबईचा प्रथम नागरिक म्हणून महापौरांना बैठकीतील निर्णयांबाबत माहिती देणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करतात, असा आरोप विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.