मुंबई – फोर्ट परिसरातील इमारतीमध्ये भीषण आग; १८ गाड्या घटनास्थळी

60

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – फोर्ट परिसरातील इमारतीत भीषण आग लागली आहे. पटेल चेंबर्समध्ये ही आग लागली असून आग वाढत चालली आहे. अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पहाटे पाच वाजता ही आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान आगीमुळे इमारतीचा काही भाग कोसळला असल्याची माहिती मिळत आहे. इमारतीचा भाग कोसळल्याने अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.