मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

103

पुणे, दि. १९ (पीसीबी) – उन्हाळी सुट्ट्या आणि विकेंड असल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (रविवार) वाहतूक  कोंडी झाली आहे. महामार्गावर  मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली आहे.  मोठ्या संख्येने खासगी वाहने मार्गावर आल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.  

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाववर बोरघाटात दत्तवाडी ते अमृतांजन पुलापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळपासूनच बोरघाटात तीन किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.  उन्हाळी सुट्टी आणि विकेंडमुळे चाकरमानी बाहेर पडले आहेत.

गावी जाण्यासाठी खासगी वाहनांसह एसटी बसेसनांही नागरिकांची मोठी गर्दी असल्याचे दिसून येत आहे.  लग्नसराई, मुलांना असलेली उन्हाळी सुट्ट्यामुळे मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांची गावी जाण्याकडे लगबग सुरू आहे. एसटी बस, रेल्वे गाड्यांनाही नागरिकांनी गर्दी केली आहे.