मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १० वाहने एकमेकांना धडकली;१ ठार

72

लोणावळा, दि. ६ (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात दोन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. आज (गुरूवार) सकाळी झालेल्या या अपघातात १० वाहनांची एकमेकांना धडक झाली. यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. ५ कार, ४ ट्रक आणि एका टेम्पोची एकमेकांना धडक झाली. तर दुसऱ्या अपघातात एकूण ८ वाहने धडकली.