मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर  वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर

62

पुणे, दि. २० (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर  वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर  रोख लावण्यात महामार्ग पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. अशा वाहनांवर कारवाई करणे, हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान ठरले आहे. आता वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी उपाययोजना आखण्यास सुरूवात केली आहे. याचाच भाग म्हणून पळस्पे येथे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या माध्यमातून    वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच १ हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.