मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दरड कोसळली; वाहतुक ठप्प

102

खंडाळा, दि. १० (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटातील आडोशी बोगद्‌याजवळ आज (बुधवार) दुपारी चारच्या सुमारास अचानक दरड कोसळली.  यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

सुदैवाने या घटनेत कसलीही हानी झाली नाही. मात्र वारंवार या ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडत असल्याने त्वरी उपाय योजना करण्याची मागणी प्रवासी आणि चालक करत आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास देखील याच ठिकाणी दरड कोसळली होती. त्यावेळी देखील वाहतुक ठप्प झाली होती.