मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन विचित्र अपघातात एकाचा मृत्यू; दहा जण जखमी

113

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (बुधवार) दोन विचित्र अपघात झाले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत.

पहिला अपघात कामशेत सडवली गावच्या हद्दीत झाला. मुंबई वरून पुण्याला येताना पीक अप गाडी डीवाडयडरला धडकली. यात चालकाचा मृत्यू झाला तर क्लिनर जखमी झाला. तर दुसरा अपघात तेलंगण महामंडळाची एसटी बस तेलंगणवरून मुंबईला बोरवलीला जाताना ओझर्ड गावाच्या हद्दीत झाला. बसने अज्ञात वाहनाला धडक दिली. या अपघातात बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले. चौघांची प्रकृती गंभीर तर पाच किरकोळ जखमी आहेत. सर्वांना सोमटणे फाट्याच्या स्पर्श हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तळेगाव दाभाडे पोलील अधिक तपास करत आहेत.