मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सात दिवसांचा ब्लॉक; वेळापत्रक जाणून घ्या

81

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – महिन्याभरात पावसाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे धोकादायक दरडी काढण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सात दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे.  तळेगाव टोलनाका ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ला जोडणाऱ्या मार्गिकेवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.  १४ मे ते १७ मे आणि २१ मे ते २३ मे या कालावधीत  हा ब्लॉक  घेण्यात येईल.

ब्लॉक खालीलप्रमाणे असेल  –

ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत दरतासाला १५ मिनिटांकरिता वाहतूक बंद करण्यात  येईल.  यावेळी एकूण ६ ब्लॉक असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्लॉक पुढील प्रमाणे असेल.

वेळ –

ब्लॉक १- १०.०० ते १०.१५, ब्लॉक २ – ११.०० ते ११.१५, ब्लॉक ३ – १२.०० ते १२.१५, ब्लॉक ४ – २.०० ते २.१५, ब्लॉक ५ – ३.०० ते ३.१५ आणि ब्लॉक ६ – ४.०० ते ४.१५ या दरम्यान १५ मिनिटांचा ब्लॉक.