मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; पालघरच्या पोलिस उपनिरीक्षकसह चार जण गंभीर जखमी

417

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – रायगड-मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पालघरचे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत देसाई यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास रसायनीजवळ हा अपघात झाला. होंडा सिटी कारने पुढे चाललेल्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.