मुंबई-पुणे इंटरसिटी रेल्वेचा अपघात टळला

252

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – डाऊन लाईन वरील रुळाला तडे गेल्याचे रेल्वे कर्मचारी सुनिल कुमार यांच्या लक्षात आल्यावर त्याने मुंबईहून पुण्याला येणारी इंटरसिटी एक्सप्रेस तातडीने थांबवल्याने पुढचा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, मंकी हिल परिसरात आज (मंगळवारी) सकाळी पावणे नऊच्या सुमारास सुनिल कुमार रेल्वे लाईनला तडे गेल्याचे लक्षात आले. त्याचदरम्यान तेथे मुंबई-पुणे इंटरसिटी रेल्वे आली. सुनिल कुमारने प्रसंगावधान राखत ती रेल्वे थांबवली. यामुळे पुढचा अनर्थ टळला. रेल्वे लाईन दुरुस्त केल्यानंतर थांभवलेली रेल्वे पुढे पाठवण्यात आली. त्यामुळे ही रेल्वे पुण्यात पंचवीस मिनिटं उशिरा पोहचली, त्यामागून पुण्याकडे येणाऱ्या काही रेल्वेही उशिरा धावत आहेत.