मुंबई-गोवा महामार्गावर इको आणि बसचा भीषण अपघात; ५ ठार ४ जखमी

232

रत्नागिरी, दि. ११ (पीसीबी) –  जिल्ह्यातील लांजा वाकेड येथील मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार तर, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

रत्नागिरी येथील मुंबई-गोवा महामार्गावर हा अपघात झाला. राजापूरहून लांज्याला येणाऱया इको गाडी आणि बसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडीतील ५ जण ठार तर, ४ जण जखमी झाले आहेत.  दरम्यान बहुतांश नागरिक गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणातील आपल्या गावी जातात यामुळे मोठ्या संख्येने मुंबई-गोवा महामार्गावर गर्दी होऊन अपघात होतात.