मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना नजरकैदेत ठेवल्याचा दावा

91

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या घराबाहेर स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त लावून त्यांना अधिकृप्तपणे नजरकैदेत ठेवले असल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.

मी कुठलेही आंदोलन अथवा मोर्चा काढला नाही, असे असतानाही मला नजरकैदेत का ठेवण्यात आले, असा सवाल निरुपम यांनी केला आहे. याबाबत कुठलीही माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आलेली नसल्याचेही निरुपम यांनी म्हटले आहे.

संजय निरुपम हे अंधेरी लोखंडवाला येथील ब्रेवरी हिल्स परिसरात राहतात. येथे त्यांच्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे. पोलिसांनी बाहेर जाण्यावर निर्बंध आणल्याचाही दावा निरुपम यांनी केला आहे.